आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर पश्चिम मुंबई वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
सदर बैठकीला माझ्यासह माजी आमदार श्रीमती भारती लव्हेकर, अंदमान निकोबारचे भाजपा प्रभारी श्री रघुनाथ कुलकर्णी, उत्तर पश्चिम जिल्ह्याचे महामंत्री श्री दीपक कोतेकर, उत्तर पश्चिम जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री विठ्ठल बंदेरी, माजी नगरसेवक श्री रोहन राठोड इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबईसाठी सर्वांनी एकजूट होऊन भाजपाची पताका अधिक बुलंद करण्याचा निर्धार केला.











Leave a Comment