नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आज वरळीत ‘जनआक्रोश’! ![]()
भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात आणलेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ या महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी आणि युपीएच्या दुटप्पी धोरणाविरोधात आज वरळीच्या रस्त्यावर महिलांचा जनआक्रोश उसळला. जांभोरी मैदान ते वरळी डोम या दरम्यान निघालेल्या या विराट मोर्चात मी स्वतः सहभागी होऊन विरोधकांच्या महिलाविरोधी भूमिकेचा तीव्र निषेध केला.
याप्रसंगी राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण जी, मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे, भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा श्रीमती चित्राताई वाघ, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीमती माधवीताई नाईक, राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, भाजपा महिला मोर्चा मुंबईच्या अध्यक्षा योजनाताई ठोकळे, आणि भाजपचे सर्व आदरणीय खासदार, आमदार, नगरसेवक व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चाचा समारोप झाल्यानंतर वरळी येथील NSCI डोम येथे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी उपस्थित हजारो महिलांना संबोधित केले. आपल्या भाषणातून त्यांनी विरोधकांच्या दुटप्पी राजकारणाचा समाचार घेतला आणि भाजप महिलांच्या हक्कासाठी व सन्मानासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.
महिलांचे हक्क डावलणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही!

















Leave a Comment