गोविंदा आला रे आला, नशामुक्तीचा संदेश घेऊन आला! 🚩
भारतीय जनता पार्टी आणि राजयोग प्रतिष्ठान मुंबई द्वारा वरळीतील सदानंद हॉटेल समोर आयोजित ‘वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, कॅबिनेट मंत्री, आमदार माननीय ॲड. आशिष शेलार जी, विधानपरिषदेचे गटनेते श्री. प्रवीणभाऊ दरेकर, भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. किरणजी शेलार जी, जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी यांच्यासह सहभागी झालो.
या महोत्सवाच्या माध्यमातून समाजात ‘नशामुक्तीचा संदेश’ पोहोचवण्याचा जो महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला गेला, तो खरोखरच अत्यंत कौतुकास्पद आहे. या उत्कृष्ट दहीहंडी उत्सवाचे आयोजन केल्याबद्दल निमंत्रक श्री. दिपक अ. सावंत (वरळी संयोजक, भाजप) आणि ॲड. मदन गुप्ता, शैलेंद्र सिंह, प्रा. आरती पुगावकर, स्वप्निल जगदाळे व सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.














Leave a Comment