आज रवींद्र नाट्य मंदिर, मुंबई येथे मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित ‘LET’S TALK WITH OUR SPEAKER’ या कार्यक्रमास मी उपस्थित राहिलो. यावेळी मुंबईवर प्रेम करणाऱ्या मुंबईकर शिक्षकांशी जिव्हाळ्याचा संवाद साधला.
मुंबईतील विविध प्रश्नांवर, समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. शिक्षकांच्या बहुमोल सूचना, अपेक्षा आणि स्वप्नातील मुंबईबद्दलच्या आकांक्षा जाणून घेतल्या. शिक्षक विकास मंडळाचे डॉ. विशाल कडणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले होते. यावेळी आयोजकांनी मला माझे उत्तम आणि सुंदर असे छायाचित्र भेट म्हणून दिले.
मुंबईतील विविध शाळांमधील शिक्षकांनी या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या प्रसंगी मंचावर माझ्यासोबत महा-एमटीबी मुंबई तरुण भारतचे संपादक श्री किरण शेलार जी, सुप्रसिद्ध संगीतकार अनु मलिक जी, महाराष्ट्राचे लाडके अभिनेते, महाराष्ट्रभूषण पद्मश्री अशोक सराफ जी तसेच शिक्षक विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.















Leave a Comment