सद्बुद्धी द्या प्रार्थना
स्व. अर्णव खैरे या तरुणाच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्राला हळहळला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर आत्महत्या करण्यास अर्णवला भाग पाडणारी परिस्थिती ही अत्यंत वेदनादायी आहे. काही राजकीय पक्ष आणि नेते समाजात तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक विधाने करत आहेत. लोकांच्या भावना भडकवणाऱ्या अशा वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या विषारी वातावरणाचाच परिणाम अर्णव खैरे यांच्या या दुःखद घटनेत दिसून येतो.
अशा राजकीय प्रवृत्ती आणि व्यक्तींना सद्बुद्धी प्राप्त व्हावी, यासाठी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी, मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सद्बुद्धी द्या’ ही प्रार्थना आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी माझ्यासह कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, आमदार श्री. प्रसाद लाड जी, आमदार श्री. अतुल भातखळकर जी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, भाजपा युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष श्री. तेजिंदर सिंह तिवाना जी, भाजपा मुंबई सरचिटणीस, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.











Leave a Comment