आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य मुंबई भाजपा कुर्ला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रे जी, माजी जिल्हा अध्यक्ष श्री. सुषम सावंत जी, टिळकनगर – नेहरूनगर मंडळ अध्यक्षा श्रीमती विद्या गायकवाड, माजी नगरसेवक श्री. राजेश फुलवरिया जी, कुर्ला पश्चिम मंडळ अध्यक्ष श्री शैलेश नगरकर जी, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि विकासाभिमुख मुंबईसाठी सर्वांनी एकजूट होऊन भाजपाची पताका अधिक बुलंद करण्याचा निर्धार केला.















Leave a Comment