मुंबई महानगरपालिकेतील भाजप महायुतीचा विजय हा विजय मराठी माणसाचा विजय आहे. हा विजय मुंबईकरांचा विजय आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा विजय आहे. हा विजय मोदीजींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मुंबई शहरामध्ये जे क्रांतिकारी परिवर्तन केले त्या विकासाचा हा विजय आहे.
हा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा आहे. मुंबईकरांनी शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व षडयंत्रांचा पराभव केला असून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विजय आहे. कोविड काळात प्राणांची पर्वा न करता मुंबईकरांची सेवा करणाऱ्या आणि बलिदान दिलेल्या आमच्या ५५ कार्यकर्त्यांना हा विजय मी समर्पित करतो.
या यशासाठी मी देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डा जी, कार्यकारी अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी, देशाचे गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह व राष्ट्रीय संघटन मंत्री मा. श्री. बी.एल. संतोष जी तसेच राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी तसेच सर्व वरिष्ठ नेत्यांचे तसेच मुंबईकरांचे मनःपूर्वक आभार.
येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, वेगवान विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी भाजप– महायुती कटिबद्ध राहील, हा आमचा ठाम संकल्प आहे.









Leave a Comment