Ministry of Youth Affairs & Sports, Govt. of India आणि MY Bharat यांच्या सहकार्याने भाजपा युवा मोर्चाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त “सरदार@१५० युनिटी मार्च” ध्वजप्रस्थानाचा भव्य सोहळा सरदार पटेल स्टेडियम, वरळी येथे पार पडला. या सोहळ्यात मी उपस्थित राहिलो.
या कार्यक्रमाद्वारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त देशातील एकता, राष्ट्रभक्ती आणि नवभारताच्या संकल्पनेला अभिवादन करण्यात आले.
‘एक भारत, अखंड भारत’ या संकल्पनेला अधिक दृढ करण्यासाठी देशभरातून सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी करमसद, सरदार पटेलांच्या जन्मगावीून थेट मुंबईत प्रस्थान केले आणि देशभर अखंड एकतेचा संदेश दिला. यामुळे जनतेमध्ये राष्ट्रीय एकता दिवसाची भावना अधिक प्रगल्भ झाली आहे.
या कार्यक्रमात माझ्यासह विधानसभा अध्यक्ष मा. श्री. राहुल नार्वेकर जी, राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री. राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबईचे महामंत्री श्री. आचार्य पावन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईच्या महामंत्री श्रीमती श्वेताताई परुळेकर, तेलंगणा भाजपाचे महामंत्री श्री. गुज्जुला प्रेमेंदर रेड्डी जी, जिल्हा उपाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी, भाजपा युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष श्री. तेजिंदर सिंह तिवाना जी, श्री. किरण शेलार जी आणि देशभरातून आलेले भाजपाचे युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















Leave a Comment