Bombay YMCA, अंधेरी (पश्चिम) यांच्या वतीने आयोजित संगीताचा सुरेल सायंकाळ – “Sur Ki Drishti” या दृष्टिहीन कलाकारांच्या सुरेल संगीत कार्यक्रमात उपस्थित राहिलो.
दृष्टिहीन कलावंतांची विलक्षण प्रतिभा, त्यांची जिद्द, समर्पण आणि कलेप्रतीची निष्ठा अनुभवताना मनापासून भारावून गेलो. त्यांच्या मधुर स्वरांनी सजलेली ही सायंकाळ केवळ मनोरंजन नव्हती, तर संवेदनांना समृद्ध करणारा एक प्रेरणादायी अनुभव होता. अशा कलाकारांना अधिकाधिक व्यासपीठे मिळावीत, त्यांची कला व्यापक स्तरावर पोहोचावी, हीच मनापासून इच्छा.
सदर कार्यक्रमात माझ्यासोबत उत्तर पश्चिम जिल्हा महामंत्री श्री. दीपक कोतेकर जी आणि माजी नगरसेविका श्रीमती सुधा सिंह उपस्थित होते. या उपक्रमात मोलाचे सहकार्य केलेल्या Inner Wheel Club of Bombay Airport यांचे विशेष अभिनंदन.















Leave a Comment