राष्ट्रभक्तीचा जागर: ‘राष्ट्रभाव’ पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न! ![]()
![]()
आज दादर येथील ‘वसंत स्मृती’ येथे आयोजित एका अत्यंत प्रेरणादायी सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला. मिहाना पब्लिकेशन्स, पुणे यांच्या वतीने आयोजित, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती मा. श्री. रवींद्र माधव साठे लिखित ‘राष्ट्रभाव’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी सरकार्यवाह परम आदरणीय श्री. सुरेश (भय्याजी) जोशी यांची मुख्य उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रभक्ती आणि निष्ठेचा जो विचार मांडला गेला, तो खरोखरच प्रत्येकासाठी दिशादर्शक आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ स्वयंसेवक आणि पद्मश्री दादा इदाते जी, माझे सहकारी आमदार श्री. अतुल भातखळकर जी, लेखक श्री. रवींद्र साठे जी, आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘राष्ट्रभाव’ हे पुस्तक केवळ शब्दांचा संग्रह नसून, आपल्या राष्ट्रप्रती असलेल्या कर्तव्याची आणि प्रेमाची जाणीव करून देणारा एक ठेवा आहे. रवींद्र साठेजींनी मांडलेले विचार समाजमनावर राष्ट्रवादाची मोहोर उमटवतील, असा मला ठाम विश्वास आहे.
पुस्तकाच्या लेखनाबद्दल रवींद्र साठे जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या सोहळ्यासाठी आयोजित ऋतूपर्ण कुलकर्णी व अमृता कुलकर्णी यांचे आभार!
विकासासाठी राष्ट्रभाव, प्रगतीसाठी राष्ट्रवाद! ![]()
![]()













Leave a Comment