यारी रोड एएलएम (ALM) सदस्यांसोबत स्थानिक नागरी समस्यांसंदर्भात आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकांचे प्रश्न वेळेत सोडवणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करणे ही नेहमीच माझी प्राथमिकता राहिली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत यारी रोड परिसरातील स्वच्छता, रस्ते, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
याप्रसंगी माझ्यासोबत स्थानिक नगरसेवक तथा ‘के-पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्ष श्री. रोहन राठोड जी आणि ‘के-पश्चिम’ वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर श्री. चक्रपाणी आरले उपस्थित होते.
यारी रोड परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या स्थानिक समस्या तातडीने आणि वेळेत कशा सोडवता यातील, याबाबत वॉर्ड ऑफिसर आणि संबंधित प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.












Leave a Comment