डी. एन. नगर येथील रहिवाशांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात आज उपस्थित राहिलो. या कार्यक्रमामध्ये आधी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांची ‘मन की बात’ ऐकण्यात आली, त्यानंतर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ट्रान्समिशन टॉवरमुळे लादलेले उंचीचे निर्बंध शिथील झाल्यामुळे परिसरातील जुन्या व जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, ही आनंदाची बाब आहे.
या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या मनातील आनंद आणि समाधान या कार्यक्रमातून व्यक्त झाले. रहिवाशांनी व्यक्त केलेले प्रेम आणि आशीर्वाद हेच माझ्यासाठी पुढील कार्याची प्रेरणा आहेत.
यावेळी माझ्यासह नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, तसेच मंडळ अध्यक्ष श्री. भवन कामतेकर उपस्थित होते. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने परिसराच्या विकासासाठी असेच सातत्याने काम करत राहू, ही ग्वाही देतो. ![]()














Leave a Comment