आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक यशस्वीरीत्या पार पडली.
तसेच, आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. या प्रसंगी वरिष्ठ नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावरील तयारी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे तसेच जनतेपर्यंत विकासकामांची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस राष्ट्रीय महामंत्री (संगठन) मा. श्री. बी. एल. संतोष जी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी, भाजपाचे सरचिटणीस मा. श्री. विनोद तावडे जी, कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी ॲड. आशिष शेलार जी, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष मा. श्री. राहुल नार्वेकर जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, मुंबईतील सर्व आमदार तसेच पक्षाचे सर्व सरचिटणीस उपस्थित होते.











Leave a Comment