Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची नवी जबाबदारी, नवी आव्हाने आणि विजयाचा निर्धार …

    Home Blog मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची नवी जबाबदारी, नवी आव्हाने आणि विजयाचा निर्धार …
    NextPrevious

    मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदाची नवी जबाबदारी, नवी आव्हाने आणि विजयाचा निर्धार …

    By admin | Blog | 0 comment | 25 August, 2025 | 0

    राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपा मुंबई अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली. यावेळी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रवींद्र चव्हाण जी यांनी मला नियुक्तीचे अधिकृत पत्र दिले.
    या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आ. मा. श्री. रविंद्रदादा चव्हाण, महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते, तसेच आ. श्री. प्रविण दरेकर जी, आ. श्री. योगेश सागर जी, आ. श्री. संजय उपाध्याय जी यांच्यासह मुंबईचे सर्व जिल्हाध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
    आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री मा. श्री. अमित शाह जी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे.पी. नड्डा जी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून इतकी महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून झालेल्या प्रमुख पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांनी मुंबईला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. यात कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था आणि २०११ पर्यंत झोपडपट्टीवासीयांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच अल्प, कमी व मध्यम उत्पन्न गटांसाठी घरे देण्यासाठी राबविण्यात आलेल्या गृहनिर्माण सुधारणा यांचा समावेश आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह, देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई परिवर्तनाच्या मार्गावर आहे आणि ते पुढे नेण्याचे काम मी व माझे सहकारी करू.
    मुंबईसाठी पक्षाचे हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. महायुतीचा भगवा झेंडा बीएमसीवर फडकवण्यासाठी आणि बीएमसीमध्ये महायुतीचा महापौर बसवण्यासाठी आम्ही सर्व एकदिलाने काम करू. पायाभूत सुविधा, गृहनिर्माण व वाहतूक व्यवस्थेबरोबरच मुंबईकरांची सुरक्षा व सुरक्षितता याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देऊ आणि मुंबईचा रंग बदलण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडू.
    तसेच १९९७ ते २०२२ या काळात बीएमसीमध्ये झालेल्या देशातील सर्वाधिक ३ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापासून मुंबई महानगरपालिकेला मुक्त करण्यासाठी आणि नागरी प्रशासनात पारदर्शकता व जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी मी व माझे सहकारी सर्वतोपरी प्रयत्न करू.
    मुंबईत पक्षाचे संघटन अधिक बळकट व दृढ करण्यासाठी आपण सर्व मला सहकार्य कराल, या विश्वासाने मी मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी नम्रपणे स्वीकारतो. दिग्गजांनी भूषविलेल्या या पदावर माझी निवड करून माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि मला ही संधी दिल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो तसेच, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार करतो.

    #AmeetSatam, #BJPMumbai, #BJPMumbaiPresident

    admin

    More posts by admin

    Related Posts

    • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!

      By admin | 0 comment

      गोविंदा रे गोपाळा !वडाळा विधानसभेत स्प्रिंग मिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी वडाळा विधानसभेतर्फे स्थानिक आमदार माननीय श्री. @KalidasKolambkr जी यांच्या पुढाकाराने आयोजित दहीहंडी उत्सवात सहभागी झालो.या शुभप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री.Read more

    • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!

      By admin | 0 comment

      वरळीच्या जांबोरी मैदानावर ॲड. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने ‘परिवर्तन इंडिया फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’ सोहळ्याला उपस्थित राहिलो. दहीहंडीच्या उत्साहाला नशामुक्त महाराष्ट्राचा सामाजिक संकल्प जोडणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.या शुभप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीयRead more

    • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!

      By admin | 0 comment

      गोविंदा आला रे आला, नशामुक्तीचा संदेश घेऊन आला! 🚩भारतीय जनता पार्टी आणि राजयोग प्रतिष्ठान मुंबई द्वारा वरळीतील सदानंद हॉटेल समोर आयोजित ‘वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी, कॅबिनेटRead more

    • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!

      By admin | 0 comment

      Had darshan and performed abhishek at ISKCON Temple, Juhu on the occasion of Janmashtami.Read more

    • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!

      By admin | 0 comment

      भारतीय जनता पार्टी विलेपार्ले विधानसभा आणि नगरसेवक (वॉर्ड क्र. ८५) श्री. मिलिंद शिंदे जी यांच्या तर्फे आयोजित भव्य ‘दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये भाजप जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे जी व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहिलो. तसेच,Read more

    Leave a Comment

    Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    NextPrevious

    Recent Posts

    • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
    • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
    • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
    • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
    • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
    • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
    • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
    • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
    • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
    • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

    Video

    Facebook

    Ameet Satam

    Twitter

    Tweets by @AmeetSatam

    Contact Info

    BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

    Email: ameetsatam@yahoo.com

    Powered By Trivoli Digital Private Limited
    • Home
    • Profile
    • Achievements
    • Portfolio
      • Gallery
      • Videos
    • Events
    • News
      • Latest News
      • Press Release
    • Contact Us
      • Contact Us
    Ameet Satam – MLA Andheri West