वरळीच्या जांबोरी मैदानावर ॲड. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने ‘परिवर्तन इंडिया फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’ सोहळ्याला उपस्थित राहिलो. दहीहंडीच्या उत्साहाला नशामुक्त महाराष्ट्राचा सामाजिक संकल्प जोडणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
या शुभप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी, कॅबिनेट मंत्री, आमदार माननीय ॲड. आशिष शेलार जी, विधानपरिषदेचे गटनेते माननीय श्री. प्रवीणभाऊ दरेकर, महापौर श्रीमती रितूताई तावडे उपस्थित होत्या.
या स्तुत्य उपक्रमासाठी आयोजक श्री. संतोष पांडे जी व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन! श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक होत नशामुक्त आणि सक्षम महाराष्ट्राचा संकल्प अधिक दृढ केला.












Leave a Comment