अंधेरी तहसीलच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासह अत्याधुनिक सेतु केंद्रांतर्गत विविध सेवांचा शुभारंभ कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो.
नागरिकांना प्रगत सुविधा देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, या उपक्रमामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढून सेवांचा लाभ अधिक वेगाने व सुलभ पद्धतीने नागरिकांना मिळेल, याचा मला आनंद आहे.
कार्यक्रमाला मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार (भा.प्र.से.), उत्तर मुंबई सा. बां. वि, अंधेरीचे कार्यकारी अभियंता श्री. सचिन धात्रक, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीवर्ग तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















Leave a Comment