अंधेरी (प.) येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ अंतर्गत विशेष समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. Chandrashekhar Bawankule जी आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री ना. श्री. Mangal Prabhat Lodha जी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकाभिमुख उपक्रम पार पडला.
या शिबिराच्या माध्यमातून ७/१२ उतारे, फेरफार प्रकरणे आणि विविध शासकीय दाखल्यांचे वाटप एकाच छताखाली करून महसूल सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. विशेषतः, झोपडपट्टी पुनर्विकास (SRA) प्रकल्पातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले, ही आनंदाची बाब आहे. या कार्यक्रमाला नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, नगरसेवक श्री. रुपेश सावरकर जी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हे अभियान अत्यंत प्रभावी ठरत आहे. या यशस्वी आयोजनाबद्दल महसूल विभाग आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.











Leave a Comment