





अभय योजनेतून नवजीवनाची सुरुवात- गिल्बर्ट हिल विशेष शिबीर
जुहू गल्ली, गिल्बर्ट हिल येथील रखडलेला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून, परिशिष्ट २ चे सुसूत्रीकरण करण्यासाठी आजपासून गिल्बर्ट हिल येथे ‘अभय योजने’अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे.
सदर शिबिराचे उद्घाटन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सीईओ डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते, माझ्या उपस्थितीत पार पडले.
या ठिकाणी मोठ्या संख्येने झोपडपट्टीवासी नागरिक शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. ६ हजारांहून अधिक झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने देवाभाऊ यांच्या सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून परिशिष्ट २ चे सुसूत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर, येथे रिहॅब इमारतींच्या बांधकामास सुरुवात होणार आहे. परिणामी, या भागातील हजारो कुटुंबांना पक्के, सुरक्षित आणि सन्मानाचे निवासस्थान मिळेल.
“प्रत्येक भारतीय नागरिकाचे स्वतःचे घर असावे – घरात वीज, पाणी आणि शौचालय असावे,” हे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न आहे.
या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र शासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आणि दूरदृष्टीपूर्ण आहे.







Leave a Comment