आज वसंतस्मृती, दादर येथे रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्यास उपस्थित राहिलो.
या मेळाव्यात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या कष्टकरी वर्गाशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या. उपस्थित बांधवांना संघटनशक्तीचे महत्त्व, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा तसेच सन्मानजनक जीवनमान याविषयी मार्गदर्शन केले. कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तर ठोस कृतीतून पाहिले पाहिजे, हा ठाम विश्वास यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, सरचिटणीस गणेश खणकर जी, सरचिटणीस श्रीमती श्वेताताई परूळकर, सरचिटणीस राजेश शिरवडकर जी, आघाडी संयोजक प्रतिक कर्पे जी, महाराष्ट्र राज्य रेल्वे संयोजक कैलाश वर्मा जी, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक अरुण दळवी जी, दिलीप गोडांबे जी आदी मान्यवर उपस्थित होते.















Leave a Comment