हरित मुंबई, स्वच्छ मुंबई!
भारत सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ या राष्ट्रीय जनअभियानापासून प्रेरणा घेऊन आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प उराशी बाळगून, घाटकोपर (पूर्व) येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदान येथे नगरसेविका सौ. राखी हरिश्चंद्र जाधव आणि श्री दुर्गापरमेश्वरी सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘वनमहोत्सव २०२६’ अंतर्गत भव्य वृक्षप्रदर्शन व मोफत वृक्षवाटप कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.
नगरसेविका राखी जाधव यांनी पर्यावरण रक्षणासाठी आयोजित केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि कौतुकास्पद आहे.
याप्रसंगी आमदार श्री. पराग शाह जी, भाजप मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी जी आणि इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वनमहोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना २५ हजारांहून अधिक झाडांचे मोफत वाटप करण्यात येत आहे, जेणेकरून आपल्या मुंबईला अधिक हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त बनवता येईल. या सुंदर आणि भव्य आयोजनासाठी मी आयोजक राखी जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक करतो व शुभेच्छा देतो!
चला, आपणही या चळवळीत सहभागी होऊया… एकत्र येऊया, एक झाड लावूया, एक पिढी घडवूया!

















Leave a Comment