आज भगवान शनिदेव जयंती आणि शनिश्चरी अमावस्या या पावन पर्वाचे औचित्य साधून, कांदिवली (पश्चिम) येथील सप्ताह मैदान, महावीर नगर येथे ‘विधी-विधानपूर्वक विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमाचे’ अत्यंत भव्य आयोजन करण्यात आले होते.
माजी खासदार माननीय श्री. गोपाळ शेट्टी जी यांच्या वतीने आयोजित या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होण्याची आणि दर्शनाचा लाभ घेण्याची संधी मिळाली.
या मंगलमयी प्रसंगी माझ्यासोबत मुंबई भाजपचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, मुंबई भजपा कामगार आघाडी अध्यक्ष अभिजीत राणे जी आणि नगरसेवक श्री. शिवानंद शेट्टी जी यांच्यासह अनेक पदाधिकारी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आणि असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Leave a Comment