‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त हरित मुंबईचा संकल्प! ![]()
![]()
आज ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के/पश्चिम’ विभागांतर्गत जुहू येथील ‘पुष्पा नरसी पार्क’ येथे आयोजित विशेष पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत, ‘एक पेड माँ के नाम’ या पवित्र संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केले आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा दृढ संकल्प केला.
मुंबईसारख्या महानगराला अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून योगदान देणे ही काळाची गरज आहे.
या प्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, के/पश्चिम विभागाचे उद्यान विभाग अधिकारी, अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि देवतुल्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातूनच आपण पर्यावरणाचा समतोल अधिक मजबूत करू शकतो, हा विश्वास आजच्या या उपक्रमातून पुन्हा दृढ झाला. ![]()
![]()













Leave a Comment