कार्यकर्त्यांचे समर्पण, भाजपचे यश ![]()
पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी निवडणुकीपूर्वी १०६ पैकी ७० मंडळ अध्यक्षांच्या भेटी घेऊन सकारात्मक चर्चा केली होती. आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर, उर्वरित सर्व अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानण्यासाठी ‘धन्यवाद यात्रा’ पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
याच उपक्रमांतर्गत आज कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील मंडळ अध्यक्ष श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
ज्या निष्ठवान कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट करून महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकवला आणि भाजपचा महापौर विराजमान केला, त्या कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हाच या भेटींचा मुख्य उद्देश आहे.
या यात्रेमुळे संघटनेचा प्रत्येक स्तर अधिक एकजुटीने, सामंजस्याने आणि प्रभावीपणे कार्यरत राहील, असा मला ठाम विश्वास आहे.
याप्रसंगी सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











Leave a Comment