📍बीएमसी मुख्यालय, भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय
बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा- शिवसेना महायुतीच्या पारदर्शक कारभाराचे आणि गतिमान विकासाचे १०० दिवस यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल बीएमसी मुख्यालयातील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करून प्रगतीचा लेखाजोखा सादर करण्यात आला.
महायुती सरकारने पहिल्या १०० दिवसांच्या कालावधीत “निर्णयक्षम नेतृत्व, वेगवान कामगिरी आणि सुशासन” या त्रिसूत्रीवर काम करत खड्डेमुक्त मुंबई अभियान, हायटेक सागरी स्वच्छता, दर्जेदार आरोग्य सुविधा आणि डिजिटल नागरिक सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रांत घेतलेले निर्णय मुंबईकरांचे जीवन सुकर करणारे ठरले आहेत.
आजच्या या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत माननीय महापौर श्रीमती रितूताई तावडे, सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले जी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे जी, शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजश्री शिरवडकर,आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गेजी, बेस्ट समिती अध्यक्षा श्रीमती तृष्णा विश्वासराव जी, सुधार समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोषी जी यांच्यासह पालिकेतील सर्व वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“बोलणारे नाही, तर थेट कृती करणारे सरकार” हीच महायुतीची ओळख असून, मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुंबईकरांच्या हक्कासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करत राहू हीच आमची वचनबद्धता आहे.














Leave a Comment