मुंबई येथे मुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा राष्ट्रीय सह-संघटन मंत्री आदरणीय श्री. शिवप्रकाशजी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महाराष्ट्र कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि जनहितार्थ राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रजी चव्हाण, महसूलमंत्री मा.श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिषजी शेलार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. श्री. अतुलजी सावे, पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे, माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. रावसाहेबजी दानवे, ज्येष्ठ नेते मा. श्री. सुधीरजी मुनगंटीवार व पक्षाचे इतर सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. विकासाचा संकल्प आणि संघटनेची ताकद घेऊन आपण ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्यासाठी सज्ज आहोत!








Leave a Comment