मुंबईत प्रथमच ‘समक्ष जागेवर SRA समस्या निवारण’
मुंबईच्या इतिहासात प्रथमच एक नवा आणि क्रांतिकारी पायंडा पडला आहे! राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी यांच्या गतिमान मार्गदर्शनाखाली, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) व बृहन्मुंबईच्या पुढाकारातून विलेपार्ले पश्चिमेत आयोजित केलेले ‘समक्ष जागेवर समस्या निराकरण शिबिर’ (SRA जनता दरबार) आज प्रचंड प्रतिसादात अत्यंत यशस्वीपणे पार पडले.
झोपडीधारकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तर प्रशासनाने स्वतः त्यांच्या दारी यावे या उद्देशाने हे विशेष शिबिर घेण्यात आले. यामध्ये SRA चे मुख्य कायदेशीर सल्लागार, तांत्रिक विभागाचे प्रमुख आणि वर्ग-१ चे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट जागेवरच उपस्थित राहून खालील मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही केली:
१) बायोमेट्रिक दुरुस्ती संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर केल्या.
२) रहिवाशांच्या पात्रता निश्चिती व अपात्रतेबाबतच्या तक्रारींवर जागेवर तोडगा काढला.
३) प्रलंबित सदनिका वाटप आणि विकासकांकडून रखडलेले घरभाडे मिळवून देण्याबाबत थेट आदेश दिले.
४) SRA योजनांची सद्यस्थिती आणि कलम ३३ खालील प्रकरणांना गती दिली.
या ऐतिहासिक लोककल्याणकारी उपक्रमाप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंधेरी जी, नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, नगरसेविका श्रीमती सुनिता मेहता जी यांच्यासह भाजप पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकडो कुटुंबांना एकाच छताखाली, एकाच दिवशी कायदेशीर न्याय मिळवून देता आला, याचे मनःपूर्वक समाधान आहे. प्रत्येक बांधवाला हक्काचे हवेशीर घर आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत कटिबद्ध आहोत!















Leave a Comment