आज भारतीय जनता पार्टी – मुंबई आणि ‘गायत्री सोशल अँड मेडिकल रिलीफ ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीमद्भगवद्गीता पठण व वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख उपस्थिती लावून सर्व विजेत्या व सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला.
लहान वयातच मुलांच्या मनावर श्रीमद्भगवद्गीतेतील अमूल्य शिक्षण आणि संस्कार रुजवणे, हा अत्यंत स्तुत्य प्रयत्न आहे. या माध्यमातून आपली नवी पिढी नक्कीच संस्कारी आणि राष्ट्रप्रेमी बनेल, यात शंका नाही.
या प्रसंगी आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष ॲड. ज्ञानमूर्ती शर्मा जी, मुंबई भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष अभिजीत राणे जी, कल्याण प्रभारी श्री. जयप्रकाश ठाकूर जी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला आमंत्रित केल्याबद्दल मुंबई भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते मोहन गौडा जी आणि मुंबई भाजप महिला मोर्चाच्या चिटणीस इंद्राणी गौडा (राणे) जी यांचे मनःपूर्वक आभार!
या सुंदर उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे व सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
















Leave a Comment