जय हरी विठ्ठल….
संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित रेल्वे प्रवासी भजन मेळावा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या प्रसंगी माझ्यासह भारतीय जनता पार्टी, मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकरजी, तसेच भजन मेळाव्याचे संयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भजन प्रेमी उपस्थित होते.
रेल्वे प्रवाशांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या भजन मेळाव्यात संत परंपरेतील अभंग, भजने आणि कीर्तन सादर करण्यात आले.
या वेळी सादर होणाऱ्या भजनांच्या सुरातून अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. या उपक्रमामुळे दैनंदिन धावपळीच्या जीवनात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना क्षणभर आत्मिक शांती व सकारात्मक ऊर्जा मिळाल्याचे समाधानकारक चित्र पहावयास मिळाले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट व शिस्तबद्ध संयोजन महाराष्ट्र राज्य रेल्वे संयोजक श्री. कैलास शर्माजी, सार्वजनिक श्री. गणेश अरुण दळवीजी, आघाडी संयोजक श्री. प्रतीक कर्पेजी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत उत्तमरीत्या केले.
अशा प्रकारचे सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरतात.
या भक्तिमय आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रमासाठी मी आयोजकांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या पुढील समाजोपयोगी यशस्वी उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो!
















Leave a Comment