संविधान दिनाच्या पवित्र निमित्ताने, अंधेरी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात ‘संविधान गौरव अभियान’ रथाचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला.
मुंबईकरांमध्ये संविधानिक मूल्यांची जनजागृती निर्माण करणे, तसेच लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. येत्या काही दिवसांत हा रथ मुंबईतील विविध प्रभागांमध्ये भ्रमण करून संविधानाबद्दल जागरूकता आणि अभिमान निर्माण करण्याचे कार्य पार पाडणार आहे.
‘संविधान मूल्यांचा प्रसार – हीच आमची बांधिलकी’ या ध्येयाने प्रेरित होऊन भाजपा मुंबई या अभियानाला व्यापक रूप देत आहे.
या प्रसंगी भाजपा मुंबईचे महामंत्री श्री. राजेश शिरवडकर, अनुसूचित जाती मोर्चा – भाजपा मुंबईचे अध्यक्ष श्री. शरद कांबळे तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.















Leave a Comment