क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज प्रतीक्षा नगर, सायन कोळीवाडा येथे आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन जी यांच्या पुढाकाराने ‘वीर सावरकर कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रा’चे उद्घाटन समारंभ पार पडले.
राज्याचे कौशल्य विकास मंत्री, मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या शुभ प्रसंगी माझ्यासह मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. नीरज उभारे जी, नगरसेविका श्रीमती शिल्पा केळुस्कर जी, नगरसेविका श्रीमती रेखा यादव जी, नगरसेविका श्रीमती कलपेशा कोठारी जी, नगरसेविका श्रीमती साक्षी कनोजिया जी देखील उपस्थित होत्या.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या ‘कौशल्य भारत’ अभियानातून प्रेरणा घेऊन आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील युवा शक्तीला सक्षम करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रशिक्षण केंद्र सायन कोळीवाड्यातील तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी देऊन आत्मनिर्भर बनवेल, असा मला ठाम विश्वास आहे.
आमदार कॅप्टन सेलवन जी व त्यांच्या संपूर्ण टीमचे या उत्कृष्ट पुढाकाराबद्दल मनःपूर्वक कौतुक!















Leave a Comment