गणपती बाप्पा मोरया! ![]()
काल अंधेरीच्या प्रत्येक घराघरात, प्रत्येक हृदयात स्थान असलेल्या सुप्रसिद्ध अंधेरीच्या राजाचे दर्शन घेण्याचा आणि महाआरती करण्याचा सन्मान लाभला. बाप्पाच्या तेजोमय मूर्तीत डोळे भरून पाहताना अंधेरीतील माझ्या सर्व बांधवांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदावे अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.
गणेशोत्सव हा केवळ सण नसून, तो आपल्या परंपरेचा, संस्कृतीचा आणि सामूहिक ऐक्याचा उत्सव आहे. हजारो भाविकांच्या अपार श्रद्धेतून उभा राहिलेला हा उत्सव आज अंधेरीकरांच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे.
गणरायाच्या या महाआरतीत सहभागी होताना केवळ भक्तिभावच नाही, तर समाजासाठी निष्ठा आणि सेवाभावाची प्रेरणा देखील मिळाली.











Leave a Comment