जय भीम! ![]()
![]()
अंधेरी पश्चिम येथील बुद्ध नगर मधील बुद्ध विहाराच्या ‘पंचशिल सांस्कृतिक केंद्रा’च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून महामानवाला विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या महान कार्याला उजाळा देत, त्यांनी दिलेला सम्यक ज्ञान आणि सम्यक विचारांचा वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा संकल्प केला. बाबासाहेबांचे विचार हेच आपल्या प्रगतीचा खरा मार्ग आहेत.
यावेळी माझ्यासोबत नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेवक श्री. अनिष मकवानी जी, श्री. नरेश गमरे तसेच पंचशिल सांस्कृतिक केंद्राचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Leave a Comment