सीझर रोड ते आझाद नगर क्रमांक ३ कनेक्टिव्हिटी प्रकल्पाअंतर्गत प्रलंबित प्रकल्पात वास्तव्य करणाऱ्या एकाही नागरिकावर अन्याय होऊ नये, तसेच लवकरात लवकर रस्ता रुंदीकरण व्हावे आणि रस्त्याची वाहतूक ही या ठिकाणी सुरू व्हावी याच भूमिकेतून मी आज प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट दिली. मुंबई महानगरपालिका (BMC) आणि SRA (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पातील बाधितांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी महानगरपालिका आणि SRA च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक रहिवाशांच्या कागदपत्रांची सविस्तर तपासणी करण्यात आली. ज्या रहिवाशांकडे योग्य आणि वैध कागदपत्रे आहेत, त्यांना कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय त्यांचे हक्काचे घर मिळावे, यासाठी मी प्रशासकीय स्तरावर योग्य ती तरतूद केली आहे.
प्रत्येक पात्र लाभार्थ्याला न्याय मिळेपर्यंत आणि त्यांना हक्काचे छप्पर मिळेपर्यंत माझा हा पाठपुरावा सुरूच राहील.













Leave a Comment