वरळी विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १९६ मधील भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. सोनाली दीपक सावंत यांच्या प्रचारार्थ उपस्थित राहिलो. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधत, महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्षा सौ. शलाकाताई साळवी तसेच श्री. किरण शेलार जी उपस्थित होते. तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटित ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर प्रभाग क्रमांक १९६ मध्ये महायुतीला विजयाकडे नेण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.










Leave a Comment