संकल्प महायुतीच्या महाविजयाचा…
आज दहिसर विधानसभा वॉर्ड क्रमांक ७ येथे भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे उमेदवार श्री. गणेश खणकर जी यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार यात्रेत सहभागी होऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांना कमळाच्या निशाणीवर मतदान करून वॉर्ड क्रमांक ७ मधून भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे उमेदवार श्री. गणेश खणकरजी यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
तसेच, या प्रसंगी वॉर्ड क्रमांक ७ मधील भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे उमेदवार श्री. गणेश खणकरजी यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी, दहिसर वॉर्ड क्रमांक २ भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीच्या उमेदवार श्रीमती तेजस्वी घोसाळकर, अंकिता चौधरी सावे तसेच भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Leave a Comment