आज गोरेगाव विधानसभा, वॉर्ड ५४ येथे आयोजित नागरिक संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांची भेट घेतली व त्यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. यामध्ये नागरिक सुरक्षा, विकास आणि मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच, आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे उमेदवार श्री. विप्लव अवसरे जी यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार नागरिकांनी एकजुटीने व्यक्त केला. यावेळी वॉर्ड ५४ च्या निवडणूक कार्यालयासही भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाला माझ्यासोबत आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, श्री. मोहन गोवडा, तसेच भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













Leave a Comment