आपल्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील जुहू गल्ली, गिल्बर्ट हिल, गावदेवी, डोंगरी स्लम क्लस्टर योजनेला कार्यान्वित करण्याच्या दृष्टीकोनातून गावदेवी, डोंगरी व इतर सहकारी गृहनिर्माण संस्था झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना (KW-1) अंतर्गत, माझ्या पुढाकाराने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) वतीने ‘परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. या शिबिरास झोपुप्रा. चे सचिव श्री. दत्तात्रय नवले, सक्षम प्राधिकारी-३ डॉ. मोहन नळदकर आणि नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी देखील उपस्थित होते.
या शिबिरात नागरिकांच्या परिशिष्ट-२ संदर्भातील अडचणी सोडवून कागदपत्रांची पडताळणी व सुसूत्रीकरणाबाबत थेट मार्गदर्शन करण्यात आले, ज्यामुळे पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनाच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.











Leave a Comment