आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अंधेरी पश्चिम विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक ६९ मधील महायुतीची सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांवर, सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांवर तसेच निवडणूकपूर्व नियोजन व पुढील रणनीतीवर सखोल चर्चा करण्यात आली.
प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा, स्वच्छता, वाहतूक, पाणीपुरवठा आदी मुद्द्यांवर एकत्रितपणे विचारमंथन करत जनतेपर्यंत विकासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस वॉर्ड क्रमांक ६९ च्या उमेदवार सौ. सुधा सिंह, विश्वजीत चंद, वॉर्ड क्रमांक ६७ चे उमेदवार श्री. दीपक कोतेकर तसेच महायुतीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकजुटीने काम करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.









Leave a Comment