भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची उत्तर मुंबईतील भव्य जाहीर सभा आज गोरसवाडी, कांदिवली (पश्चिम) येथे मोठ्या उत्साहात आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाली.
या जाहीर सभेला संबोधित करताना मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी यांनी जनतेशी संवाद साधत त्यांनी राज्यातील विकासात्मक कामगिरीचा आढावा घेत, सुशासन, पारदर्शकता आणि जनतेच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी प्रथमच सादर केलेले भाजपाचे नवे प्रचारगीत. या गीताने सभास्थळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला.
या भव्य सभेला महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते, आ. श्रीमती मनीषाताई चौधरी, आ. श्री. अतुल भातखळकर जी, आ. श्री. प्रविण दरेकर जी, आ. श्री योगेश सागर जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पावन त्रिपाठी जी, माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी जी, पदाधिकारी,स्थानिक प्रतिनिधी तसेच हजारो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि परिवर्तनाच्या निर्धाराचे वातावरण पाहायला मिळाले.















Leave a Comment