जय श्री हनुमान
भक्ती आणि शक्तीचा जागर: जुहू चौपाटीवर साजरा झाला भव्य ‘हनुमान जन्मोत्सव’! ![]()
आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने पहाटे ७ वाजता जुहू चौपाटीच्या परिसरात आयोजित ‘हनुमान जन्मोत्सव’ सोहळ्यात सहभागी झालो. अथांग सागराच्या साक्षीनं आणि शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा अत्यंत चैतन्यदायी होता.
या मंगलमयी प्रसंगी माझ्यासोबत के- पश्चिम वॉर्ड के प्रभाग समिति अध्यक्ष, नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, श्री. ओ. पी. अग्रवालजी, श्री. पुरुषोत्तमजी चतुर्वेदी, श्री. शांतीलालजी, श्री. रोशनलालजी, श्रीमती उषाबेन पटेल, श्री. प्रीतेश गांधी, श्री. किशोर भाई, श्रीमती झबीनजी, श्रीमती सँड्राजी आणि सुमारे ६०० हून अधिक भाविक उपस्थित होते.
संकटमोचक हनुमान राया चरणी हीच प्रार्थना की, सर्वांचे जीवन सुख-समृद्धीने आणि उत्तम आरोग्याने संपन्न व्हावे. भक्तीच्या या महाकुंभात सहभागी होऊन मन प्रसन्न झाले.













Leave a Comment