नारी शक्तीचा जागर: सक्षम महिला, समर्थ भारत! ![]()
![]()
‘नारी शक्ती विचार मंच’ आयोजित ‘नारी शक्ती महिला संमेलन’ आज दादर येथील योगी सभागृहात उत्साहात पार पडले. या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी झालो.
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन कायदा’ मंजूर करून महिलांना राजकारणात ३३% आरक्षण दिले आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी आज हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी मंत्री श्रीमती अदिती तटकरे जी, भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्रीमती चित्राताई वाघ, आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, चित्रपट अभिनेत्री पद्मश्री रवीना टंडन, प्रसिद्ध गायिका श्रीमती वैशाली सामंत, अभिनेत्री प्राजक्ता माळी, ग्लोबल टीचर प्राईज विजेती श्रीमती रुबल नागी आणि फॅशन डिझायनर अर्चना कोचर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर भगिनी उपस्थित होत्या. तसेच, अंधेरीच्या तहसीलदार स्नेहलता स्वामी आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव यांनी ‘नारी शक्ती वंदन विधेयका’च्या पार्श्वभूमीवर आणि भविष्यातील संधींवर अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले.
महिलांचा सन्मान आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे सरकार सदैव कटिबद्ध आहे. या ऐतिहासिक कायद्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि विकसित भारताच्या स्वप्नात महिलांचा सहभाग निश्चित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे.
नारी शक्तीला माझा मानाचा मुजरा! ![]()
![]()














Leave a Comment