बोरीवली विधानसभा वॉर्ड क्र. १३ च्या लोकप्रिय नगरसेविका सौ. @RaniRDwivedi जी यांच्या ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी विधान परिषदेचे गटनेते मा. श्री. प्रवीण दरेकर जी, आमदार श्रीमती मनिषाताई चौधरी, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, माजी खासदार मा. श्री. गोपाळ शेट्टी जी, महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, भाजप मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, नगरसेवक श्री. प्रकाश दरेकर जी, माजी नगरसेवक श्री. विद्यार्थी सिंह जी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कस्तुरबा रोडवरील हे नवीन कार्यालय स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक हक्काचे केंद्र ठरेल, हा विश्वास आहे. राणी द्विवेदी निघुट आणि त्यांच्या संपूर्ण टीमला या जनसेवेच्या नवीन पर्वाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा!











Leave a Comment