गोरेगाव आणि ओशिवरा परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या ‘मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण’ आज अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुकर आणि सुरक्षित होणार आहे.
या सोहळ्याला आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, आमदार हारून खान, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, मुंबईचे उपमहापौर श्री. संजय घाडी जी, कल्याण प्रभारी श्री. जयप्रकाश ठाकूर जी, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी, प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती श्रीकला पिल्ले जी, विधी समिती अध्यक्षा श्रीमती दीक्षा कारकर जी, सुधार समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोषी जी, विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर जी, नगरसेवक श्री. संदीप पटेल जी, नगरसेवक श्री. विक्रम राजपूत जी, नगरसेवक श्री. हर्ष पटेल जी, नगरसेविका श्रीमती प्रीती साटम जी आणि मुंबई महानगरपालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.
















Leave a Comment