आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा….
बोरीवली येथे ‘भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा’चे अत्यंत मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज साहेबांच्या पावन सानिध्यात या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला.
या सोहळ्याला आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदार श्री. परागभाई शाह, आमदार श्री. संजय उपाध्याय जी, आमदार श्री. मुर्जी पटेल जी, महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि इतर मान्यवर पदाधिकारी व जैन समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.
याच कार्यक्रमात अरहम ऑलवेज केअर २४×७ प्राणी रुग्णालय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाँच करण्यात आले, तसेच मुंबईच्या डबेवाल्यांना १०८ ई-बाईक्स आणि दिव्यांग व्यक्तींना २५ ई-बाईक्स वितरित करण्यात आल्या.
जैन समाजाच्या प्रगतीसाठी आणि भगवान महावीरांच्या ‘अहिंसा परमो धर्म’ या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत.
















Leave a Comment