आम्ही शब्द दिला होता…
आणि तो शब्द आम्ही पूर्ण केला!
मुंबईचा महापौर हिंदूच होणार,
मुंबईचा महापौर मराठीच होणार,
आणि महायुतीचाच होणार…
हे आम्ही केवळ बोलून दाखवले नाही, तर करून दाखवले!
आज सौ. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी निवड होऊन मुंबईकरांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाले आहे. जेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टोळीने मुंबईची अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि हिंदुत्वाशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुंबईकरांनीच त्यांचा डाव उधळून लावला.
मुंबई कोणाच्या राजकीय प्रयोगशाळेसाठी नाही,
मुंबई कोणाच्या अहंकारासाठी नाही,
मुंबई ही मराठी माणसाची, हिंदुत्वाची आणि विकासाची राजधानी आहे आणि ती तशीच राहणार!
महायुतीने दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
मुंबईकरांचा कौल स्पष्ट आहे
दुहेरी भूमिका, दुटप्पी हिंदुत्व आणि संधीसाधू राजकारणाला मुंबईत स्थान नाही.
महापौर सौ. रितू तावडे यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
मुंबईच्या विकासाचे नवे पर्व आता सुरू झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
जय श्रीराम!











Leave a Comment