भारतीय जनता पार्टी मुंबई गुजराती सेलतर्फे आयोजित ‘धरा, धर्म आणि ध्वज’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला.
विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेली ही सांगीतिक संध्या आणि बक्षीस वितरण सोहळा खऱ्या अर्थाने आपली संस्कृती, वारसा आणि राष्ट्रवादाचा उत्सव ठरला.
यावेळी माझ्यासोबत भाजप मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, सचिव व नगरसेवक श्री. प्रतिक कर्पे जी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. तसेच प्रसिद्ध गायक सुनील आणि गौरव सोनी यांनी आपल्या सुरांनी या सोहळ्यात चैतन्य भरले. आपल्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी असे उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत.
जय हिंद! जय महाराष्ट्र! ![]()












Leave a Comment