जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai तर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘ग्रँड सायक्लोथॉन – पेडल फॉर प्लॅनेट’ या शानदार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली’ हा संदेश देणाऱ्या या सायकल रॅलीमध्ये स्वतः सहभागी होऊन सायकल चालवण्याचा आनंद घेतला तसेच, ‘जागतिक पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनानुसार ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा छोटासा संकल्प देखील केला.
याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष श्री. अजिंक्य नाईक जी यांच्यासह माझे सहकारी आमदार श्री. संजय उपाध्याय जी, आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी, महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, जिल्हाध्यक्ष श्री. दीपक बाळा तावडे जी, नगरसेविका श्रीमती राणी द्विवेदी जी, नगरसेवक श्री. प्रकाश दरेकर जी, नगरसेवक श्री.शिवप्रकाश झा जी आणि नगरसेवक श्री . तजिंदर सिंग तिवाना जी, भाजपा युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी तसेच अनेक पर्यावरणप्रेमी व उत्साही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चला, आपल्या पृथ्वीच्या रक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि हिरव्यागार मुंबईसाठी सायकल चालवूया!
पर्यावरण वाचवूया, निसर्गाचे जतन करूया! ![]()
![]()

















Leave a Comment