आज जुहू स्थित वॉर्ड क्रमांक ६९ मधील नेहरू नगर परिसराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.
या दौऱ्यादरम्यान नेहरू नगरमधील नालेसफाई, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि इतर मूलभूत नागरी समस्यांची जागेवरच पाहणी करून, त्या तातडीने सोडवण्याबाबत पालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. स्थानिक नागरिकांना दैनंदिन जीवनात कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
याप्रसंगी नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, जुहू-जेव्हीपीडी मंडळ अध्यक्ष श्री. विश्वजीत चंद जी यांच्यासह स्थानिक रहिवासी, भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













Leave a Comment