धारावी विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १८६ मधील भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. निला जितेंद्र सोनावणे यांच्या प्रचारार्थ तसेच त्यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची दिशा, संघटनात्मक मजबुती आणि बूथनिहाय नियोजन यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री. नीरज उभारे, श्री. गजेंद्र धुमाळे, श्री. रमेश नाडर, श्री. दीपक सिंह यांची उपस्थिती लाभली. तसेच भाजपा–शिवसेना–रिपाई महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटित ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर प्रभाग क्रमांक १८६ मध्ये महायुतीला विजयाकडे नेण्याचा ठाम निर्धार यावेळी सर्वांनी एकमताने व्यक्त केला.











Leave a Comment