रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:॥
प्रभू श्रीरामांच्या या मंगलमय श्लोकाने आणि जयघोषाने आज अवघी अंधेरी नगरी दुमदुमून गेली असून, ‘श्री राम नवमी अंधेरी उत्सव समिती’ व ‘कट्टर हिंदू संघटक’ आयोजित भव्य ‘श्री रामनवमी शोभायात्रा २०२६’ मध्ये सहभागी झालो.
‘कपासवाडी’ परिसरातून निघालेल्या या पवित्र सोहळ्यात भगवे ध्वज, पारंपारिक वाद्यांचा गजर आणि “गर्व से कहो हम हिंदू है” या जाज्वल्य गर्जनेने एक अभूतपूर्व भक्तीचा महासागर लोटला होता.
याप्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, संयोजक जगत गुप्ता जी, वॉर्ड अध्यक्ष सचिन सिंग जी, स्थानिक नागरिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या भक्तिमय वातावरणात प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होण्याची आणि हिंदू संस्कृतीचा हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्याची संधी मिळाली.












Leave a Comment